Skip to main content

Posts

Showing posts from May, 2018

स्वचि

'सेल्फी'चे संस्कृतनिष्ठ भाषांतर करता येईल 'स्वयंचित्र'. पण हा शब्द फारच मोठा आहे नाही? शिवाय 'कूल'सुद्धा वाटत नाही हा! मग काय करुयात? 'स्वयंचित्र' हा शब्द 'स्वयम्' आणि 'चित्र' असा दोन शब्दांचा बनलाय ना! त्या दोन्हीही शब्दांची सुरुवातीची अक्षरे 'स्व' आणि 'चि' घेऊन नवीन शब्द बनवूयात, 'स्वचि'!! वाटतो की नाही, 'कूल'!! तेव्हा 'सेल्फी' ह्या प्रत्यक्षातल्या लघुकारी शब्दासाठी मी एक पूर्णतः नवा आणि तसाच एक लघूकारी शब्द देतोय, 'स्वचि'!! आता कुणाला वाटेल की, मी संस्कृतच्या व्याकरणनियमांचा भंग केलाय. हा आक्षेप पूर्णपणे मान्य असेल मला. पण अहो, काहीतरी नवीन निर्माण करायचं म्हटलं की एखाद-दुसरा नियम तुटणारच! जुने नियम तुटक नाहीत, तोपर्यंत काहीतरी नवे कसे बनणार? फक्त नियम तोडून काही नवे बनवताना ते भाषेला समृद्ध करणारे असले म्हणजे झाले! कुणी सांगावे, आपल्या माहितीपलिकडे असे लघुरुप बनवणारा संस्कृतमध्ये एखादा नियम असूही शकेल. आणि समजा नसला, तरीही 'स्वचि'ची उपयोगिता पाहाता, इथे अपवाद करायला हरकत नाह...